स्पर्धा परीक्षेसाठी शिवनेरीचे ‘डिजिटल’ तंत्र!

स्पर्धा परीक्षेसाठी शिवनेरीचे ‘डिजिटल’ तंत्र!

पुणे - प्रचंड तयारी करूनही स्पर्धा परीक्षेत अपयश का येते? विद्यार्थी आणि पालकांना सतावणाऱ्या या प्रश्‍नाला उत्तर देणारे नवे तंत्र पुण्याच्या शिवनेरी फाउंडेशनने विकसित केले असून, हे अभ्यासाचे तंत्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उच्चगुणवत्ता असलेल्या उमेदवारांना यशाच्या समीप नेणारे ठरणार आहे. 

‘सकाळ विद्या’ व ‘शिवनेरी फाउंडेशन’च्या वतीने या उपक्रमाची सुरवात लवकरच संपूर्ण राज्यात होत आहे. 

स्पर्धा परीक्षेसाठी राज्यातून दरवर्षी सात ते आठ लाख विद्यार्थी नशीब आजमावतात. त्यासाठी अपार मेहनत करण्याची तयारीही महाराष्ट्रातल्या उमेदवारांकडे आहे. शहरी भागातील विद्यार्थी कोचिंग क्‍लासेस, ॲकॅडमींचा आधार घेतात. मात्र गृहिणी, नोकरदार आणि ग्रामीण भागांतील उमेदवारांपुढे यश मिळवण्याचा प्रश्‍न नेहमीच उभा राहतो. अशा विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय सर्वेक्षण करून शिवनेरी फाउंडेशनने हे डिजिटल तंत्र विकसित केले आहे.

कशा आहेत डिजिटल नोट्‌स?
 उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, फौजदार, कर सहायक, सहायक, लिपिक, तलाठी, पोलिस शिपाई ते वनसेवेच्या सरळ सेवा भरतीपर्यंत प्रत्येक परीक्षेचा अभ्यासक्रम या नोटसमध्ये असेल.
 साधारणतः २०० तासांचा अभ्यासक्रम. 
 विविध परीक्षांमधील संपूर्ण अभ्यासक्रम. 
 उच्च दर्जाच्या दृकश्राव्यफितीतील व्याख्याने.
 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्याही हे तंत्रज्ञान आवाक्‍यात असणार.
 दृकश्राव्य व्याख्याने मोबाईलमधील मेमरी कार्ड तसेच पेनड्राईव्हमध्येही उपलब्ध.

या परीक्षा असतील डिजिटल स्वरूपात !
 राज्यसेवा परीक्षा ः फौजदार (पोलिस उपनिरीक्षक), एसटीआय (विक्रीकर निरीक्षक), मंत्रालयीन सहायक (एएसओ), कर सहायक (टॅक्‍स असि.), तलाठी, लिपिक भरती परीक्षांसह खात्यांतर्गत फौजदार परीक्षा.

हे तंत्रज्ञान कोणा-कोणासाठी?
गृहिणी, नोकरदार, पदवीधर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी.

अपयश दूर करा...आत्मविश्‍वासाने परिपूर्ण व्हा...
आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण व निमशहरी भागात राहूनच स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना घरबसल्या स्पर्धा परीक्षेची तयारी अगदी कोचिंग क्‍लासेससारखीच करता येईल. उच्च दर्जा व गुणवत्तेचे व्हिडिओ लेक्‍चर्स युवक-युवतींना त्यांच्या मोबाईल, लॅपटॉप, संगणकावरही अभ्यासता येतील. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना स्वतंत्रपणे ताज्या घडामोडी अखंडित उपलब्ध होतील. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाबरोबरच मॉक टेस्ट, प्रश्‍नपत्रिकांचा सराव करून घेतला जाईल. निवडक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाईल. 

शिवनेरी फाउंडेशनने ‘व्हिडिओ लेक्‍चर्स डिजिटल नोट्‌स’ची निर्मिती केली आहे. ‘सकाळ’च्या राज्यातील विविध आवृत्त्यांच्या कार्यालयांतून या डिजिटल नोट्‌स उपलब्ध होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com