आम्ही फायटर नव्हे, प्रोटेक्‍टर आहोत!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

‘यिन’च्या विद्यार्थ्यांनी साधला ‘बाउन्सर’शी संवाद

पुणे - रंगमंच किंवा व्यासपीठाच्या डाव्या-उजव्या बाजूला निर्विकार मुद्रेने पण समोरच्याला धडकी भरेल अशा आविर्भावात अनेक कार्यक्रमांत उभे असणारे ‘बाउन्सर’ पाहिले असतीलच ना? मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या सोबत ही मंडळी हमखास पाहायला मिळतात. कधीही कुणाच्या अध्यात-मध्यात नसणारे; पण वेळ पडली की एका नजरेत समोरच्यांना गपगार करणारे... ‘यिन’च्या विद्यार्थ्यांना मंगळवारी अशाच एका ‘बाउन्सर’ व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग जाणून घेता आले.

‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) समर यूथ समिटच्या समारोपाच्या दिवशी एका आगळ्यावेगळ्या सत्रात विद्यार्थ्यांना बाउन्सर समीर खान अर्थात सॅम भाईंशी गप्पा मारता आल्या. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी अझीम खान हेही उपस्थित होते.

भारतातील अनेक आघाडीच्या सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवण्याचा अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असणारे सॅम भाई हे त्यांच्या क्षेत्रातील एक विनयशील बाउन्सर म्हणून ओळखले जातात. आपल्या स्मितहास्याने त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधायला सुरवात केली.

सॅम भाई म्हणाले, ‘‘एरवी मंचाच्या केवळ बाजूंनाच असणाऱ्या माझ्यासारख्याला आज चक्क मंचावरून तुम्हां सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळालीय, याचा खूप आनंद झालाय. बाउन्सर समोर दिसला की, काही क्षण आपल्याला घाबरून जायला होतं; पण मला तुम्हांला सांगूदेत की, बाउन्सरही तुमच्यासारखेच एक असतात. त्यांना घाबरायची गरज नाही. एखाद्या ठिकाणी चुकीचे काही घडू नये, यासाठी सुरक्षा जपणारी एक व्यक्ती म्हणजे बाउन्सर असते. आम्ही फायटर नव्हे, तर तुमचे प्रोटेक्‍टर आहोत.’’

यह फिल्ड भी दिलवाता हैं इज्जत।
सॅम भाई म्हणाले, ‘‘बाउन्सर म्हटले की अनेकांच्या भुवया उंचावतात. अनेक जण या क्षेत्राविषयी प्रश्‍न उपस्थित करतात; पण हे क्षेत्रही तुम्हाला इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे प्रतिष्ठा देणारे आहे. एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी आम्ही प्रसंगी स्वतःचा विचारही करत नाही, हे या क्षेत्राची प्रतिष्ठा दाखवायला पुरेसे नाही का? आम्ही सामान्य नागरिक आणि सेलिब्रिटी यांच्यातील दुवाच आहोत. यह फिल्ड भी इज्जत देनेवाला हैं.’’

Web Title: pune news discussion with fighter