तलाकबाबत राजकारण नका - शायरा बानो

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

पुणे - ‘‘मी समाजशास्त्रात एम.ए. केले. सध्या मी फायन्सान्स अँड मार्केटिंगमध्ये एमबीए करत आहे. कारण मला माझ्या पायावर उभे राहायचे आहे. मुस्लिम समाजातील शोषित महिलांबाबत काम करायचे आहे. कारण आजही बहुपत्नीत्व आणि हलाला प्रकरणांनी अनेक महिला पीडित आहेत. म्हणूनच तोंडी तलाकबाबत कायदा व्हावा. मात्र त्याचे राजकारण करू नये,’’ अशी भावना तोंडी तलाक विरोधात न्यायालयात याचिका दाखल करून अन्यायाविरोधात लढणाऱ्या शायरा बानो यांनी व्यक्त केली. 

मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे आयोजित वार्तालापप्रसंगी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मूळच्या उत्तराखंड राज्यातील काशीपूर येथील रहिवासी असलेल्या शायरा बानो यांच्यासमवेत त्यांचे बंधू अर्शद अली, शकील अहमद, मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी उपस्थित होते. 

तांबोळी म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने तोंडी तलाकबाबत दिलेल्या निर्णयाला मार्चमध्ये सहा महिने होतील. तत्पूर्वी कायदा व्हायला पाहिजे. याबाबत मंडळातर्फे सह्यांची मोहीम राबवीत आहोत. कारण न्यायालयाने निर्णय देऊनसुद्धा अजूनही तोंडी तलाक होत आहेत. या विषयावर दिल्ली येथे मे २०१८ मध्ये महिलांची राष्ट्रीय स्तरावरील परिषद भरविणार आहोत. मंडळाला २२ मार्चला ४८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने गुलशन परवीन, इशरत जहाँ, अतिया साबरी, आफरीन रेहमान, शायरा बानो यांना ‘फातिमा बी शेख’ पुरस्काराने सन्मानित करणार आहोत.’’

मला न्याय मिळेल का? कोणी साथ देईल का? असे वाटत होते. पण महिला संघटना माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. तलाकबाबत मी न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयानेही २२ ऑगस्टला निर्णय दिला. मात्र कायदा झाला पाहिजे. मुस्लिम महिलांनी याविषयी एकत्रित येऊन समाजात जनजागृती करावी. मानसिकता बदलणे गरजेचे आहे. समाजातील शिक्षित व अशिक्षित महिलांवर अजूनही अत्याचार होत आहेत. त्यांच्या मुलांचे भविष्य अंधारात आहे. कायदा होऊन महिलांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे.
- शायरा बानो

Web Title: pune news Do not politicize divorce