डॉ. मेधा खोले यांच्याकडून 'सोवळे' मोडल्याची तक्रार मागे

अनिल सावळे
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

पुणे : "सोवळे' मोडल्याच्या कारणावरून महिलेविरुद्ध हवामानशास्त्र विभागाच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांनी केलेली तक्रार अखेर आज (शनिवार) मागे घेतली. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा फसवणुकीचा दाखल झाला होता. याबाबत विविध सामाजिक संघटनांकडून निषेध व्यक्‍त करण्यात येत होता.

संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, घरेलू कामगारसह काही संघटनांनी खोले यांच्यावर टीका केली होती. तर, "डॉ. खोले आणि निर्मला यादव यांच्यातील वाद वैयक्तिक असून, त्यांनी तो सामोपचाराने मिटवावा', अशी भूमिका अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मांडली होती.

निर्मला यादव यांनी जात लपवत सुवासिनी असल्याचे सांगून आपल्या घरी स्वयंपाकाचे काम केले. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार खोले यांनी केली होती. तर, खोले यांनीच आपल्याला घरी येऊन मारहाण केल्याची फिर्याद यादव यांनी दिली होती. या परस्परविरोधी तक्रारींवरून खोले आणि यादव या दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, खोले यांनी आज शनिवारी सायंकाळी सिंहगड पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा मागे घेण्यासाठी अर्ज केला होता.

Web Title: pune news dr medha khole return police complaint