डॉ. कोल्हे यांचे उद्या व्याख्यान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पुणे - ‘सकाळ साप्ताहिक’च्या एकतिसाव्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता कोल्हे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘समाजसेवेचे व्रत’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. मंगळवारी (ता. १०) संध्याकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता येथे होणार आहे. 

आरोग्य व शिक्षण क्षेत्रात निष्ठेने काम करताना डॉ. कोल्हे यांनी जाणीवपूर्वक मेळघाटाची निवड केली. कायदा आणि होमिओपॅथीचे शिक्षण त्यांनी एकदमच घेतले, पण त्या वैद्यकीय क्षेत्रात अधिक रमल्या. नागपूरमध्ये त्या होमिओपॅथीची प्रॅक्‍टिस करू लागल्या. दरम्यान, डॉ. रवींद्र कोल्हे यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला. बैरागडसारख्या कुठलीही सोय नसलेल्या गावात एक खोली, चुलीवरचा स्वयंपाक, सारवलेल्या भिंती, महिन्याचे अवघे चारशे रुपये उत्पन्न असा त्यांचा संसार सुरू झाला. त्या भागातील केवळ आदिवासींचीच नाही, तर महिलांचीही स्थिती दयनीय असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याविरुद्ध त्यांनी आवाजही उठवला. सुरवातीला त्या डॉक्‍टरांबरोबर बाळंतपणाच्या केसेस बघत. पण नंतर हळूहळू त्यांनी आपली प्रॅक्‍टिसही सुरू केली आणि डॉक्‍टरांएवढाच तेथील लोकांचा विश्‍वास संपादन केला. प्रथम आरोग्यसेवा आणि नंतर आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या दांपत्याने अथक परिश्रम केले. मेळघाटातील डोंगराळ प्रदेशात शेतीचे आव्हान स्वीकारून ‘प्रयोग बघा आणि शेती करा’ असे उपक्रमही राबविले. 

Web Title: pune news Dr. Smita Kolhe