पुण्यात आजपासून ‘एज्युकेशन एक्‍स्पो’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

सर्व शैक्षणिक पर्याय एकाच छताखाली; मार्गदर्शनपर चर्चासत्रचे आयोजन

पुणे - दहावी व बारावीच्या परीक्षेनंतर करिअरसंबंधी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना मदत म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’ने शुक्रवार (ता. २६) पासून तीन दिवसांच्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१७’चे आयोजन केले आहे.

स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे शैक्षणिक प्रदर्शन खुले राहणार असून, नामांकित शिक्षण संस्थांचा त्यात सहभाग आहे. प्रदर्शनात शाखा निवडीचे पर्याय व करिअर यांविषयी करिअर तज्ञांचे मार्गदर्शनपर सेमीनारही आयोजित केले आहे. शाळा, महाविद्यालयांतील, कला, वाणिज्य, शास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, तंत्रशिक्षण, वैद्यकीय, हॉटेल मॅनेजमेंट, पॅरामेडिकल, आर्किटेक्‍चर, माहिती-तंत्रज्ञान तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांबद्दल आणि विशिष्ट विषयातील पदविकांबद्दल माहिती विद्यार्थी आणि पालकांना एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे करिअरची निवड, प्रवेश परीक्षा व अभ्यासक्रम या बाबत माहिती मिळण्याची प्रक्रिया सुलभ होईल.  प्रदर्शनाची ‘द युनिक ॲकॅडमी’ मुख्य प्रायोजक असून, एकत्वम ॲकॅडमी, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ॲस्ट्यूट करिअर कौन्सलिंग ॲकॅडमी आणि सृजन कॉलेज ऑफ डिझाईन हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. तज्ज्ञांच्या सेमीनारचे वेळापत्रक ‘सकाळ विद्या’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

‘एक्‍स्पो’ बाबत अधिक माहिती 
तारीख : २६, २७ व २८ मे
स्थळ : गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे 
वेळ : सकाळी ११ ते रात्री ८ 
मार्गदर्शनपर सेमीनार विषयी अधिक माहीतीसाठी :  
www.sakalvidya.com या संकेतस्थळाला भेट देणे.

Web Title: pune news education expo