पुण्यात धावणार ५०० ई-बस

गुरुवार, 22 मार्च 2018

पुणे - शहरात लवकरच ५०० इलेक्‍ट्रिक बस धावणार आहेत. खासगी कंपन्यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ई- बसचे सादरीकरण केले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यासाठी ५०० बस घेण्याच्या सूचना दिल्या. शिवाय नागपूर आणि नाशिकमध्येही ई-बस धावू शकतील का, याबाबत चाचपणी करण्यास सांगितले. 

ई-बससाठी पीएमपीमार्फत निविदा मागविल्या जातील. एक वर्षात टप्प्याटप्प्याने या बस उपलब्ध होऊ शकतात, असे मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत सहभागी झालेले पीएमपीचे संचालक आणि नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.  या बस संबंधित कंपन्या खरेदी करतील आणि पीएमपीला भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देतील. त्यासाठी सुमारे ८ ते १० वर्षांसाठी संबंधित कंपन्यांबरोबर करार करण्यात येईल. इलेक्‍ट्रॉनिक बसला चार्जिंग करण्यासाठी पीएमपीच्या सर्व आगारांत यंत्रणा उभारणे शक्‍य आहे; परंतु सुरवातीच्या टप्प्यात दोन ठिकाणी चार्जिंग करण्यात येईल. सहा तासांत किंवा ४५ मिनिटांत बस चार्ज होऊन १०० ते ३०० किलोमीटर अंतर धावू शकते. पोलंड, तैवान, चीनमधील कंपन्यांनी पीएमपीबरोबर काम करण्यासाठी स्वारस्य दर्शविले आहे. 

ई-बसची वैशिष्ट्ये
 लांबी सुमारे १२ मीटर 
 ४० प्रवाशांना बसण्याची, 
   २० प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था
 एक किलोमीटरसाठी ११ रुपये खर्च

Web Title: Pune news electric bus PMC 500 e-buses to run in Pune