इंग्रजी शाळांना मिळाले 161 शिक्षक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

पुणे - महापालिकेच्या शाळा सुरू झाल्यावर अखेर इंग्रजी माध्यमातील शिक्षकांच्या नियुक्‍त्या झाल्या आहेत. येत्या चार दिवसांत 161 शिक्षक आता वर्गांवर तास घेतील. त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

महापालिकेच्या सुमारे 30 इंग्रजी शाळांत शिक्षकांची 172 पदे रिक्त होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. त्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही उमटले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने मानधन तत्त्वावर आणि सहा महिन्यांच्या मुदतीने 161 शिक्षकांची नियुक्ती केल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल तेली- उगले यांनी दिली. तसेच महापालिकेच्या विशेष मुलांसाठीच्या शाळांनाही दोन शिक्षक महापालिकेला मिळाले आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये या पूर्वी शिक्षकांना सहा हजार रुपये वेतन होते; परंतु ते अपुरे असल्याची टीका झाल्यामुळे स्थायी समितीने त्यात नुकतीच वाढ करून ते दहा हजार रुपये केले आहे. येत्या चार दिवसांत हे शिक्षक वर्गांवर रुजू होतील. त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे, असेही तेली यांनी नमूद केले. 

Web Title: pune news english medium school teahcer