दिवाळीत "एसटी'च्या जादा गाड्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

पुणे - दिवाळीसाठी परगावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार ता. 14 ते 18 ऑक्‍टोबर दरम्यान शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी- चिंचवडसह सीओईपी मैदान, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी महाविद्यालय येथून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत.

शिवाजीनगर स्टॅंड येथून नियमित गाड्या सोडल्या जाणार आहेत. स्वारगेट स्टॅंड येथून नियमित गाड्यांबरोबरच कोल्हापूर, सोलापूर व पंढरपूरसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. पिंपरी- चिंचवड स्टॅंड येथून नियमित गाड्यांसह चिपळूण, कोल्हापूर, यावलसाठी गाड्या सोडल्या जातील. या सर्व गाड्यांचे तिकीट आरक्षित करता येणार आहे.

सीओईपी मैदानावरून
नागपूर, अकोला, अमरावती, अंबड, अहमदपूर, अंबाजोगाई, बीड, औसा, सिल्लोड, चोपडा, धुळे, हिंगोली, जाफराबाद, जालना, कळंब, मलकापूर, लातूर, मेहकर, जामनेर, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, परळी, परभणी, परतूर, पुसद, शेगाव, तुळजापूर, उदगीर, उमरगा, वाशीम, यावल, यवतमाळ, बुलडाणा या गाड्या सुटतील.

जादा गाड्या कृषी महाविद्यालयातून
कृषी महाविद्यालय येथून ता. 15 ते 18 ऑक्‍टोबर या कालावधीत नाशिक व औरंगाबाद विभागात जाणाऱ्या केवळ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तिकिटावर इंग्लिशमध्ये "एजीआरजीडी' व "एक्‍स्ट्रा बस' असा उल्लेख असलेल्या प्रवाशांनी कृषी महाविद्यालय या ठिकाणी यावे.

सीओईपी मैदान येथून सुटणाऱ्या गाड्यांचे तिकीट आरक्षित करण्यासाठी "ईएनजीजीडी' आणि कृषी महाविद्यालय येथून सुटणाऱ्या गाड्यांसाठी "एजीआरजीडी' असा संक्षिप्त कोड असणार आहे. याची प्रवाशांनी दखल घ्यावी, असे आवाहन एसटीचे विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी केले.

Web Title: pune news extra st for diwali