Pune News : आंतरजातीय विवाह केल्याने लपवून ठेवलेल्या विवाहितेला शोधून हजर करा; न्यायालयाचा कोथरूड पोलिसांना आदेश

पत्नीचा ताबा मिळावा म्हणून कोथरूडमध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय पतीने न्यायालयात अर्ज केला होता.
pune
punesakal
Updated on

पुणे - आंतरजातीय विवाह केल्याने कुटुंबीय घेऊन गेलेल्या विवाहितेला शोधून आठ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात हजर करा, असा आदेश न्यायालयाने कोथरूड पोलिसांना दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हा निकाल दिला. विवाहितेचा शोध घेण्यासाठी न्यायालयाने शोध वॉरंट देखील काढले आहे.

पत्नीचा ताबा मिळावा म्हणून कोथरूडमध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय पतीने न्यायालयात अर्ज केला होता. त्याची दखल घेत न्यायालयाने हा आदेश दिला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अशोक आणि सुरेखा (नावे बदललेली) हे दोघे एकाच कंपनीत कामाला होते. पाच वर्षांपासून ते एकमेकांचे ओळखीचे आहेत. ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यांनी १२ मे २०२२ ला विवाह केला. लग्नानंतर सुरेखा या अशोक यांच्याकडे नांदण्यासाठी गेल्या. लग्नाची माहिती त्यांनी कुटुंबीयांनी दिली होती.

आठ ऑक्टोबरला अशोक हे कामावर गेले असता सुरेखा यांचे कुटुंबीय त्यांच्या घरी आले व सुरेखा यांना माहेर घेऊन गेले. अशोक घरी आल्यानंतर त्यांना पत्नी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी पत्नीचा शोध घेतला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांकडे देखील चौकशी केली. तेव्हा त्यांना समजले की, सुरेखा यांचे कुटुंबीय त्यांना घेऊन गेले आहेत.

pune
Pune : हॉटेल व्यावसायिकाला किटली निवडणुक चिन्हामुळे किटलीतील चहा वर आक्षेप आल्याने थर्मास मध्ये चहा आणावा लागला

काही दिवसांनी सुरेखा यांनी त्यांच्या बहिणीच्या मोबाईलवरून अशोक यांच्याशी संपर्क साधला. आंतरजातीय विवाह केल्याने घरच्यांनी डांबून ठेवले आहे. तसेच माझा मोबाईल काढून घेतल्याचे त्यांनी अशोक यांना सांगितले. त्यानंतर अशोक यांनी पत्नीच्या घरच्यांशी संपर्क साधला. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, असे त्यांनी दाखल केलेल्या अर्जात नमूद आहे.

पत्नीचा शोध लागत नसल्याने अशोक यांनी ॲड. रमेश राठोड, ॲड. पूजा वाघमोडे आणि ॲड. तृप्ती सोनटक्के यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली. पत्नीचा शोध घेऊन तिचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांना आदेश देण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. अशोक यांचा अर्ज मंजूर करत न्यायालयाने सर्च वॉरंट काढले आहे.

pune
Pune News : दिवाळी सणाच्या निमित्ताने पश्चिम हवेलीतील शेतकऱ्यांना घरपोच साखर वाटप

सुरेखा यांनी सहमतीने अशोक यांच्याशी विवाह केला आहे. त्यामुळे पती-पत्नीचे नाते टिकावे. त्यांची भेट व्हावी, यासाठी आम्ही न्यायालयात अर्ज केला. या प्रकरणात घटनेचे गांभीर्य आणि दिलेले पुरावे पाहून न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

ॲड. रमेश राठोड, अशोक यांचे वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com