
पुण्यात हॉटेलला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. पुण्यातील दत्तवाडी भागातील प्रसिद्ध आशा हॉटेलमध्ये आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. स्थानिक आणि ग्राहकांना हादरवून सोडणाऱ्या या घटनेत हॉटेलमधील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.