पिंपरी: चिखलीतील कंपनीला आग; जिवीतहानी नाही

संदीप घिसे
रविवार, 28 जानेवारी 2018

आगीची माहिती मिळताच तळवडे उप अग्निशामक केंद्र आणि संत तुकाराम नगर अग्निशामक मुख्यालय येथून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एमआयडीसी अग्निशामक दलाचाही बंब घटनास्थळी दाखल झाला.

पिंपरी : शेलारवस्ती, चिखली येथील टेन्को व्हीजन या कंपनीला आज (रविवारी) पहाटे दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशामक दलास मिळाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच तळवडे उप अग्निशामक केंद्र आणि संत तुकाराम नगर अग्निशामक मुख्यालय येथून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एमआयडीसी अग्निशामक दलाचाही बंब घटनास्थळी दाखल झाला. एक तासात ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलास यश आले. आगीचे कारण समजू शकले नाही.

Web Title: Pune news Fire in Pimpri Company