पुणे: जुनी सांगवीत फटाक्यामुळे आगीची घटना

रमेश मोरे
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

कसोटे कुटुंब यावेळी घरी नव्हते. परिसरात लक्ष्मीपुजनानिमित्त फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना दुसऱ्या मजल्यावरील कसोटे यांच्या बाल्कनीत फटाक्याची ठिणगी जावुन गॅलरीत ठेवलेल्या अडगळीच्या सामानाने पेट घेतला. लाकडी खुर्च्या, दोन मोकळे सिलिंडर व लाकडी वस्तुने पेट घेतल्याने काही क्षणातच धुराचा लोट दिसु लागल्याने स्थानिक शेजाऱ्यांनी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील उपनगर असलेल्या जुनी सांगवी येथील त्रिमुर्ती अपार्टमेंट जयमालानगर गल्ली क्रं. पाच येथे विलासन हरिश्चंद्र कसोटे यांच्या घराला फटाक्याच्या उंच उडालेल्या ठिणगीमुळे आग लागण्याची घटना घडली.

कसोटे कुटुंब यावेळी घरी नव्हते. परिसरात लक्ष्मीपुजनानिमित्त फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना दुसऱ्या मजल्यावरील कसोटे यांच्या बाल्कनीत फटाक्याची ठिणगी जावुन गॅलरीत ठेवलेल्या अडगळीच्या सामानाने पेट घेतला. लाकडी खुर्च्या, दोन मोकळे सिलिंडर व लाकडी वस्तुने पेट घेतल्याने काही क्षणातच धुराचा लोट दिसु लागल्याने स्थानिक शेजाऱ्यांनी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. कसोटे परिवारातील सदस्य बाहेर गेल्याने घर बंद होते. स्थानिक रहिवाशी संजय काळे, यांनी प्रथम अपार्टमेंटचा विद्युत पुरवठा बंद करून अग्निशामक दलास कळवले.

शेजारी व नागरिकांनी अग्निशामक दलाचे बंब पोचेपर्यंत आग आटोक्यात आणली होती. गॅलरीतील आग सुदैवाने आत घरापर्यंत पोचण्याआधी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून विझवल्याने मोठा अनर्थ टळला. लागलीच अग्निशामक दल वल्लभनगर व रहाटणी येथील दोन बंब घटनास्थळी हजर झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग पुर्णपणे विझवुन सामान बाहेर काढले. यात स्थानिक रहिवाशी संतोष काळे, अजय काळे, गणेश जाधव, शशिकांत सुर्या यांनी शर्थीचे प्रयत्न केले. आग विझवताना संतोष काळे यांच्या हाताला भाजल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. अग्निशामक दलाचे भाऊसाहेब दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास नाईक, लक्ष्मण ओव्हाळ,विलास कडु यांनी काम पाहिले.फोटो ओळ-जुनी सांगवी येथे त्रिमुर्ती अपार्टमेंट येथे दुस-या मजल्यावरील कसोटे यांच्या घराच्या बाल्कनीला उंच उडणा-या फटाक्यामुळे लागलेल्या आगीत लाकडी वस्तु व सामान जळुन खाक झाले.सुदैवाने  शेजारी नागरीकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

Web Title: Pune news fire in Sangvi