मांजरीतील फुलबाजाराचे उद्‌घाटन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मांजरी - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने मांजरी उपबाजारात सुरू केलेल्या स्वर्गीय अण्णासाहेब मगर फुलबाजाराचे उद्‌घाटन आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नगरसेवक मारुती तुपे होते. समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे, उपमुख्य प्रशासक भूषण तुपे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, वंदना कोद्रे, माजी महापौर चंचला कोद्रे, माजी उपमहापौर नीलेश मगर, किसान संघाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्‍वर तुपे, नगरसेवक उज्ज्वला जंगले, सुनील गायकवाड, रोहिदास उंद्रे, सुभाष जंगले, शिवराज घुले, सुदर्शन चौधरी, केशव कामठे आदी उपस्थित होते. 

पूर्व हवेली तालुक्‍यासह लगतच्या तालुक्‍यांत फूल उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये फुले घेऊन जावे लागत होते. शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. मांजरी उपबाजाराच्या आवारात एका इमारतीत तळमजल्यावर 14, तर त्यावरील हॉलच्या मोकळ्या जागेत 34 अशा एकूण 48 गाळ्यांमध्ये हा फुलबाजार सुरू केला आहे. हा बाजार सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 

टिळेकर म्हणाले, ""पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने मांजरी उपबाजारात फुलबाजार सुरू केला आहे. यामुळे पूर्व भागातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना चांगली सुविधा आणि संधी निर्माण झाली आहे. शेतकरी, व्यापारी आणि सामान्य ग्राहकांना याचा फायदा होईल.'' येत्या काळात यशवंत साखर कारखाना सुरू करून या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असेही टिळेकर म्हणाले. 

ऍड. अण्णासाहेब शिंदे व रमेश उंद्रे यांनी सूत्रसंचालन केले, तर शेखर बडदे यांनी आभार मानले.

Web Title: pune news flower market inauguration