स्त्रियांची मोजदाद केली जात नाही : प्रतिभा पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

पुणे: "संसार म्हणजे अंकगणितातील बेरीज-वजाबाकी नाही. संसारात एकमेकांना समजून घेण्याची बेरीज-वजाबाकी करावी लागते. अनेकदा स्त्रियांना गृहीत धरले जाते. त्यांची गणना किंवा त्यांच्या अस्तित्वाची मोजदाद केली जात नाही. तरीही त्या त्याग, समर्पण, निष्ठा, वात्सल्य या भावनेने काम करत असतात. व्यवस्थापनशास्त्रात शिकविण्यात येणारे "मल्टी टास्किंग' स्त्रिया रोज करत असतात. त्यांच्यातील आपलेपणाची भावना आणि संस्कार समाजात रुजविल्यास सुसंस्कृत समाज निर्माण होईल,'' असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केले.

श्री भवानी प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या पत्नींना "स्त्री शक्ती सन्मान' देऊन गौरविण्यात आले. यात वैशाली माशेलकर, अनुराधा संचेती, अनुराधा पवार, शारदा गोडसे, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, नीलिमा देसाई, अंजली परदेशी, ज्योती माडचेड्डी, वर्षा पवार, मनीषा खेडेकर, वैशाली खटावकर, कल्याणी सराफ, अमिता अगरवाल, सुशीला मर्लेचा, गीता गोयल या महिलांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पं. वसंतराव गाडगीळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत जाधव, सचिव अरविंद जडे, डॉ. शैलेश गुजर उपस्थित होते.

पाटील म्हणाल्या, "स्त्रियांच्या सुधारणेसाठी पुरुषांनीदेखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महिला सुशिक्षित होत असल्यामुळे देशात मोठे बदल होत आहेत.'' सत्काराला उत्तर देताना माशेलकर म्हणाल्या, "डॉ. रघुनाथ माशेलकर हे दिवसातून 18-20 तास काम करत असतात. परंतु शास्त्रज्ञ असण्याबरोबरच ते उत्तम चित्रकारही आहेत, रेखाचित्रे ही त्यांची खासियत आहे.'' या वेळी अनुराधा संचेती, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, शारदा गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रेय गायकवाड यांनी केले. डॉ. गुजर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: pune news Former President Pratibha Patil