पंचावन्न लाखांच्या फसवणूकप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

पुणे - ग्राहकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली भारती विद्यापीठ पोलिसांनी एका बांधकाम व्यावसायिकाला अटक केली. त्याने ग्राहकांकडून सुमारे 55 लाख 70 हजार रुपये घेऊन गृह प्रकल्पाचे बांधकाम न करता अपहार केला. 

पुणे - ग्राहकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली भारती विद्यापीठ पोलिसांनी एका बांधकाम व्यावसायिकाला अटक केली. त्याने ग्राहकांकडून सुमारे 55 लाख 70 हजार रुपये घेऊन गृह प्रकल्पाचे बांधकाम न करता अपहार केला. 

याप्रकरणी सचिन कामठे (रा. धनकवडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी निहल कांतिलाल घोडके (वय 29, रा. तानाजीनगर, धनकवडी) याला अटक केली आहे. आरोपीने त्याची मांगडेवाडी येथे सहा गुंठे जागा असून, त्या ठिकाणी गृहप्रकल्प बांधणार आहे. तेथे 42 सदनिका बांधण्यात येतील, असे फिर्यादींना सांगितले. फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाइकांनी या गृहप्रकल्पात सदनिका घेण्याचे ठरविले. नोंदणीशुल्क म्हणून त्यांनी एकूण 55 लाख 70 हजार रुपये त्याला दिले होते. आरोपीने जगदंबा कन्स्ट्रक्‍शन प्रमोटर्स अँड बिल्डर्स या संस्थेच्या नावाने त्यांना नोंदणी शुल्काच्या पावत्या दिल्या. ही घटना 2012 मध्ये घडली होती. आरोपीने या बांधकामाची परवानगी घेतली नाही, जागेच्या खरेदीचा दस्तऐवज केला नाही, गृहप्रकल्पाचे बांधकामच सुरू केले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे फिर्यादी आणि इतरांच्या लक्षात आले. त्यांनी पैशाची मागणी केली तेव्हा आरोपीचे वडील कांतिलाल यांनी फिर्यादींकडील पावत्या घेऊन त्यांना धनादेश दिले. परंतु हे धनादेशही वटले नाहीत. 

पोलिसांनी आरोपीला अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची 7 जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. 

Web Title: pune news fraud case

टॅग्स