भजनांजली, सुगम संगीत, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

पुणे - दासगणू महाराजरचित ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे सामूहिक पठण, भजन, प्रवचन आणि सामाजिक उपक्रमांद्वारे शेगावच्या गजानन महाराजांचा १४० वा प्रकट दिन माघ वद्य सप्तमी अर्थात बुधवारी (ता. ७) शहर व उपनगरांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. पिठलं-भाकरी, अंबाड्याची भाजी, कांदा आणि हिरव्या मिरचीचा नैवेद्य घेऊन आलेल्या अनेक भाविकांनी दर्शनाकरिता मंदिर परिसरात रांगा लावल्या होत्या. दानशूर व्यक्तींमार्फत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते.  

प्रकट दिनानिमित्त शहर व उपनगरांतील श्रींच्या बहुतांश मंदिरांत धार्मिक सप्ताह आयोजिला होता. सुगम संगीत, भावगीते, भजनांजली यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही होती. पहाटेपासूनच श्रींच्या मंदिरांत अभिषेकादी पूजा-अर्चेसाठी भाविकांची लगबग सुरू होती. मंदिरांव्यतिरिक्त बहुतांश कार्यालयांतही सेवाभावी मंडळे, समूहातर्फे श्रींचा प्रकट दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने गायक-गायिकांनी त्यांची ‘गायनसेवा’ श्रींच्या चरणी अर्पण केली. काही ठिकाणी छबिना काढण्यात आला. हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. 

सहकारनगर येथील श्री गजानन महाराज (शेगाव) सेवा प्रतिष्ठानच्या विश्‍वस्त पौर्णिमा भरत पवार म्हणाल्या, ‘‘गेल्या २५ वर्षांपासून येथे प्रकट दिन साजरा होतो. सप्ताहात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सकाळी नगर प्रदक्षिणाही झाली. श्रींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. पहाटेपासूनच भाविक श्रींच्या मूर्तीच्या दर्शनार्थ येत होते. प्रतिष्ठानतर्फे वर्षभर 
सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.’’

Web Title: pune news gajanan maharaj birth anniversary