जुनी सांगवीत गणपती उत्सवासाठी घाट सज्ज

रमेश मोरे
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुळा व पवना नदीच्या कुशीत संगमावर वसलेल्या जुनी सांगवीत गणेश उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. गणरायाच्या आगमनाच्या तयारीत  गणेश मंडळाची लगबग सध्या परिसरात सुरू असुन पालिका प्रशासनकडुनही चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याबाबत नगरसेवक हर्षल ढोरे म्हणाले जुनी सांगवीत सात ते दहा दिवसांचा गणपती उत्सव साजरा करण्यात येतो.

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत दरवर्षी प्रमाणे पालिका प्रशासनाकडुन गणपती उत्सवासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

मुळा व पवना नदीच्या कुशीत संगमावर वसलेल्या जुनी सांगवीत गणेश उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. गणरायाच्या आगमनाच्या तयारीत  गणेश मंडळाची लगबग सध्या परिसरात सुरू असुन पालिका प्रशासनकडुनही चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याबाबत नगरसेवक हर्षल ढोरे म्हणाले जुनी सांगवीत सात ते दहा दिवसांचा गणपती उत्सव साजरा करण्यात येतो. उत्सवासाठी संपुर्ण व्यवस्था ठेवण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. येथील मुळा पवना नदी परिसरातील घाटांच्या दुरूस्ती बरोबरच घाटांची स्वच्छता, विसर्जन हौदांची स्वच्छता आरोग्य व स्थापत्य विभागाकडुन करण्यात आली आहे. याच बरोबर मिरवणुक रस्त्यावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात येत आहेत.

काही भागातील जयमालानगर, मुळा नदी किनारा रस्ता यावरील खड्डे स्थापत्य विभागाकडुन बुजविण्यात आले आहेत. तर दोन दिवसापासुन सतत पडणा-या संततधार पावसाच्या उघडीपीनंतर राहिलेले खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे कनिष्ठ अभियंता संजय कांबळे यांनी सकाळशी बोलताना सांगीतले. दुरूस्ती करण्यात आलेल्या सर्व विसर्जन घाटांवर पावसाच्या पाण्याने आलेला गाळ काढुन स्वच्छता करण्यात आली आहे. याबाबत आरोग्य निरिक्षक संजय मानमोडे म्हणाले, गणपती उत्सव काळात सर्व विसर्जन घाटांवर निर्माल्यकुंड ठेवण्यात येणार आहे.मुर्ती विसर्जन हौदातच विसर्जन करण्यासाठी भाविक नागरीकांना आवाहन करण्यात येणार आहे. नागरीकांकडुन निर्माल्य संकलित करण्यासाठी कर्मचा-यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. नागरीकांनी उत्सव काळात प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.फोटो ओळ: जुनी सांगवीत गणपती उत्सवासाठी पालिका प्रशासनाकडुन घाटांची डागडुजी करून उत्सवासाठी घाट व अंतर्गत रस्ते खड्डेंमुक्त करण्यात आले आहेत.

Web Title: pune news ganesh immersion in sangvi