कचरा प्रकल्प उभारण्यासाठी संस्थांची मदत घेणार - टिळक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

पुणे - ""कचरा व्यवस्थापनासंदर्भात गेली अनेक वर्षे प्रयत्न चालू आहेत. कचऱ्यांची समस्या कायमस्वरूपी सोडविण्साठी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारले जात आहेत. या क्षेत्रातील संस्थांची मदत घेऊन नव्याने प्रकल्प उभारण्यात येईल. सध्या 46 टक्‍क्‍यांहून अधिक नागरिक कचरा जिरविण्यासाठी प्रयत्न करत आहेत,'' असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी रविवारी व्यक्त केले. 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ओपेल प्रा स्क्रो आणि समर्थ कलाविष्कार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती, मनोरंजन व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, जयंत भावे, रामचंद्र कदम व नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, अभिनेता निखिल राऊत व महापौरांचा या वेळी सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मदनदास देवी, ओपेल प्रा स्क्रोचे संस्थापक-संचालक मनोज धारप, समर्थ कलाविष्कार संस्थेचे आशुतोष वैशंपायन उपस्थित होते. या प्रसंगी मधुकर तोरडमललिखित व भालचंद्र करंदीकरदिग्दर्शित "तरुण तुर्क म्हातारे अर्क' या विनोदी दोनअंकी नाटक विविध कलाकारांनी सादर केले. सूत्रसंचालन योगेश सुपेकर यांनी केले.

Web Title: pune news garbage project mukta tilak