जुन्नर: शाळेच्या संस्थापकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

दत्ता म्हसकर
सोमवार, 29 जानेवारी 2018

सचिन उल्हास घोगरे रा. येणेरे ता.जुन्नर हा या शाळेचा संस्थापक असून गुरुवार दिनांक २५ रोजीचा पहाटे शाळेमधील बाथरूम मध्ये पाणी येते की नाही हे पाहण्यासाठी शाळेतील अल्पवयीन मुलीस बाथरूम मध्ये बोलवून तेथे तिचा विनयभंग केला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

जुन्नर : येणेरे (ता. जुन्नर) येथील इंडियन इंग्लिश मिडियम स्कूलच्या संस्थापकांने शाळेमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असल्याची तक्रार जुंन्नर पोलिस ठाण्यात रविवारी दाखल झाली आहे. आरोपीने हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली आहे अशी माहिती पोलिस उप निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिली.

सचिन उल्हास घोगरे रा. येणेरे ता.जुन्नर हा या शाळेचा संस्थापक असून गुरुवार दिनांक २५ रोजीचा पहाटे शाळेमधील बाथरूम मध्ये पाणी येते की नाही हे पाहण्यासाठी शाळेतील अल्पवयीन मुलीस बाथरूम मध्ये बोलवून तेथे तिचा विनयभंग केला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

संबधित मुलीने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. यानंतर रा.पाळशीन ता.जवाहर जि.पालघर येथे  राहणाऱ्या मुलीच्या पालकांनी शाळेत येऊन अधिक चौकशी केली असता त्यांच्या मुली बरोबर शाळेतील अन्य चार ते पाच अल्पवयीन मुली सोबत असाच प्रकार घडला असल्याचे त्यांना आढळून आले. यामुळे या गंभीर प्रकाराबाबत त्यांनी  जुन्नर पोलिस ठाण्यांत फिर्याद नोंद केली.यानंतर जुंन्नर पोलिसांनी इंडियन इंग्लिश मीडियम स्कूलचा संस्थापक असलेल्या सचिन यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध भारतीय दंड विधान  कलम ३५४,  तसेच पास्को कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील  तपास पोलीस जुंन्नर पोलीस करीत आहेत.

Web Title: Pune news girl harassment in Junnar