धान्य गोदामाची जागा महामेट्रोला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

पुणे - पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेल्या शिवाजीनगर शासकीय धान्य गोदामाच्या जागेचा आगाऊ ताबा महामेट्रोला मिळाला आहे. ही जागा मेट्रोला सुपूर्त करण्याबद्दल राज्य सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने नुकताच अध्यादेश जारी केला असून, आता ही २.६७ हेक्‍टरची जागा ताब्यात मिळेल, असे महामेट्रोने सोमवारी सांगितले. शिवाजीनगर स्थानक हे शहरातील सर्वांत आकर्षक बहुमजली मेट्रो स्थानक होणार आहे, असे महामेट्रोने म्हटले आहे. 

याबद्दल अधिक माहिती देताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, की पिंपरी- चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मेट्रो मार्गांदरम्यान शिवाजीनगर हे मध्यवर्ती ठिकाण असून, याच ठिकाणी शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो मार्गही एकत्र येणार आहे.

त्यामुळे हे ठिकाण पुणेकरांसाठी महत्त्वाचे असेल. या जागेचा ताबा मिळाल्याने प्रकल्पाला आणखी वेग येईल. ही जागा मेट्रोला आगाऊ ताब्यात देण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल आम्ही आभारी आहोत, असेही डॉ. दीक्षित यांनी नमूद केले. शिवाजीनगर स्थानकावरून कसबा पेठ आणि जंगली महाराज रस्त्याच्या दिशेने पादचारी उड्डाण पूल होणार आहे. त्यासाठीचा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे, असे दीक्षित यांनी नमूद केले.  

दरम्यान, शिवाजीनगर गोदामाच्या जागेवर विविध प्रकारची न्यायालये उभारावीत, अशी मागणी पुणे बार असोसिएशनने केली होती. परंतु राज्य सरकारने त्याची दखल घेतलेली नाही.

Web Title: pune news grain godown place for mahametro