ग्रामपंचायतींसाठी जिल्ह्यात शांततेत मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

पुणे - जिल्ह्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी, तर ९७ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी मंगळवारी (ता. २६) किरकोळ घटनांचा अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. या ग्रामपंचायतींसाठी सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. या मतदानामुळे सरपंचपदाच्या २१२ उमेदवारांचे आणि ग्रामपंचायत सदस्यपदाच्या १ हजार १३३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले. उद्या (बुधवारी) सकाळी मतमोजणी संबंधित गावांच्या तालुक्‍याच्या ठिकाणी होणार आहे. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडी (ता. बारामती), माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे निरगुडसर (ता. आंबेगाव), आमदार शरद सोनावणे यांचे पिंपळवंडी (ता. जुन्नर) आदी गावांसह हवेली तालुक्‍यातील वाघोली, जुन्नर तालुक्‍यातील नारायणगाव आणि खेड तालुक्‍यातील निघोजे आदी ग्रामपंचायतींसाठी मोठ्या चुरशीने मतदान झाले. 

राज्य निवडणूक आयोगाने येत्या फेब्रुवारीअखेर मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील ९९ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. यापैकी दोन ग्रामपंचायती अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी पूर्णपणे बिनविरोध झाल्या. उर्वरित ९७ ग्रामपंचायतींपैकी ११ गावांचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. जुन्नर तालुक्‍यातील एका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल होऊ न शकल्याने, येथील पद रिक्त राहिले आहे. त्यामुळे उर्वरित ८५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आणि ९७ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले.
या सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडले जात आहेत. त्यामुळे सरपंचपदासाठी स्वतंत्र आणि ग्रामपंचायत सदस्यपदासाठी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले होते.

आज मतमोजणी
सरपंच - ८५ जागा २१२ उमेदवार
सदस्य - ५१३ 
जागा १,१३३ उमेदवार
सरपंचपदासाठी चुरशीने मतदान

Web Title: pune news grampanchyat election