सेवाकर बुडविणाऱ्या उद्योजकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

पुणे - ग्राहकांकडून वसूल केलेला सुमारे 6 कोटी 94 लाखांचा सेवाकर सरकारी तिजोरीत भरला नाही. या प्रकरणी दोषी आढळल्यामुळे "एम. पी. एंटरप्रायझेस अँड असोसिएट्‌स लिमिटेड'(एमपीईएएल) कंपनीचे चेअरमन मधुकर अनंत पाठक यांना मंगळवारी (ता. 16) त्यांच्या बाणेर येथील राहत्या घरी "जीएसटी इंटेलिजन्स'विभागाने अटक केली. त्यांना शिवाजीनगर न्यायालयाने 23 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. 

"फायनान्स ऍक्‍ट, 1994 च्या कलम 91(1)' नुसार पाठक यांना अटक झाली. केंद्रीय जीएसटी विभागाच्या (सीजीएसटीआय) "डीजीजीएसटीआय'च्या पुणे क्षेत्रीय युनिटच्या उपसंचालक वैशाली पतंगे, सुप्रिटेंडंट रिपुसूदन कुमार यांच्या नेतृत्वाखाली "जीएसटी इंटेलिजन्स'च्या विशेष पथकाकडून ही पहिली कारवाई करण्यात आली. 

""एम. पी. एंटरप्रायझेस अँड असोसिएट्‌स लिमिटेड'(एमपीईएएल) ही नोंदणीकृत कंपनी नामांकित कंपन्यांना बससेवा आणि अन्य वाहनसेवेसह मनुष्यबळ पुरवठा करणारी कंपनी आहे. विविध सेवा देताना सुमारे 6 कोटी 94 लाखांचा सेवाकर वसूल केला; पण सरकारच्या तिजोरीत न भरता परस्पर हडप केल्याप्रकरणी ते दोषी आढळले आहेत. कंपनीच्या ताळेबंदामध्येही खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आले. धडक मोहिमेअंतर्गत पाठक यांना राहत्या घरातून अटक केली. न्यायालयीन कोठडीत असलेल्या पाठक यांच्या व्यवहारांची काटेकोर तपासणी केली जात आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. पुढील तपास "जीएसटी इंटेलिजन्स'चे सुप्रिटेंडंट रिपुसूदन कुमार हे करत आहेत.'' 

कर चुकविल्यास कारवाई 
दरम्यान, देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर त्यातील कराची रक्कम सरकारला भरली जाते किंवा नाही याची तपासणी जीएसटी इंटेलिजन्सकडून केली जाणार आहे. यामध्ये दोषी व्यावसायिक, सेवा पुरवठादार आणि उद्योजकांवर जीएसटी कायद्याअंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. ग्राहकांकडून जो सेवाकर वसूल केला जातो तो केंद्र सरकारच्या तिजोरीत पुन्हा भरणे अपेक्षित आहे; परंतु सेवाकर न भरता हडप करणे ही सरकारची फसवणूक तर आहेच; परंतु ग्राहकांचीदेखील फसवणूक असल्याचे मत जीएसटी इंटेलिजन्सने व्यक्‍त केली.

Web Title: pune news GST crime