सलग दुसऱया दिवशी कचरा गाडया आडवल्या...

संदीप जगदाळे
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

हडपसर (पुणे): प्रस्तावीत कचरा प्रकीया प्रकल्पास विरोध दर्शविण्यासाठी सलग दुसऱया दिवशी (बुधवारी) महापालिकेच्या कचरा वाहतूक करणा-या गाडया आंदोलकांनी आडवून परत पाठविल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी आंदोलन करून महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या गाडया परत पाठवल्या होत्या. दुसऱया दिवशी या आंदोलनात शिवसेना आणि हडपसर-रामटेकडी कचरा प्रकल्प हटाव समितीने देखील उडी घेतली आहे. दोन्ही पक्षाचे आजी-माजी नगरसेवक व संतप्त कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी हे आंदोलन अधिक तिव्र करण्याचा निर्धार करून नवीन कचरा प्रकल्प बंद करण्याचा निर्धार केला आहे.

हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे म्हणाले, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेचे गटनेते हडपसर येथे प्रस्तावीत कचरा प्रकल्प व्हावा यासाठी पालिकेतील सत्ताधारी भाजपाला साथ देत आहेत. मात्र या तिन्ही पक्षाचे स्थानिक नगरसेवक व कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या प्रकल्पाच्या विरोधात आहेत. त्यामुळे आम्ही या तिन्ही पक्ष व महापौर आणि आयुक्तांचा निषेध करतो. प्रस्तावीत प्रकल्पाचे काम थांबवावे, अन्यथा आंदोलन तिव्र करण्यात येईल.

याप्रसंगी नगरसेवक वैशाली बनकर, नाना भानगिरे, अशोक कांबळे, माजी उपमहापौर निलेश मगर, सुनील बनकर, सागरराजे भोसले, उत्तम आढाव आप्पा गरड, मुकेश वाडकर, सतिश हिगंणे, संजय हिंगणे, श्रीधर शरणागत, दत्ता झेंडे, पप्पू कुदळे, आप्पा शिंदे, तुषार जाधव, युसुफ पठाण, इरफान तांबोळी, तोफिक सैय्यद, नदीम पटेल, शरीफ पठाण, जॅकी कल्याणी, रॉकी कल्याणी, नागेश काळुंखे, मुस्ताक शेख, सतीश कांबळे, अर्जुन कांबळे यांसह मोठया संख्येने कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

रामटेकडी येथील पुणे ब्लाईंड मेन्स असोसिएशनच्या कार्यशाळेसमोर हे आंदोलन झाले. रामटेकडी येथील महापालिकेच्या प्रस्तावीत कचरा प्रकल्पाचे काम बंद झालेच पाहिजे, अशी नागरिक व कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी केली. सुरक्षिततेच्या दृष्टिने मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गाडया अडविल्यामुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दिवसेंदिंवस या आंदोलनाची तिव्रता वाढत चालली असून, जनमत लक्षात न घेता प्रशासन नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. हडपसर विधानसभा मतदार संघात पाच कचरा प्रकल्प आहेत. त्यामुळे हडपसरची कचरा नगरी होवू देणार नाही अशी भूमीका स्थानिकांची आहे. या प्रश्नाबाबत महिनाभरात सत्ताधा-यां विरधात सहा आंदोलने झाली आहेत. औद्योगिक वसाहतीतील कंपन्या देखील या प्रकल्पा विरोधात न्यायालयात याचीका दाखल करणार आहे. त्यामुळे कचरा प्रकल्पाचा प्रश्न दिवसेंदिवस पेटतच चालला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news hadapsar second day garbage Procedure Project issue