हडपसरमध्ये ५२५ अनधिकृत झोपडयांवर अतिक्रमणविरोधी कारवाई

संदीप जगदाळे
रविवार, 25 जून 2017

हडपसर : शिंदेवस्ती येथील नवीन-मुळा- मुठा कालव्याकडेच्या पाटबंधारे विभागाच्या जागेत नव्याने वसत असलेल्या ५२५ अनधिकृत झोपडयांवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. कारवाई दरमायन एका संघटनेने दहा ते पंधरा हजार रूपये घेवून झोपडयांना संरक्षण देतो म्हणून नागरिकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी या झोपडया टाकलेल्या नागरिकांनी केली. 

गेल्या पंधरा दिवसांपासून पत्र्याचे शेड मारून याठिकाणी झोपडया बांधल्या जात होत्या. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. शुक्रवारी नगरसेविका हेमलता मगर यांनी महापालिकेच्या सभागृहात हा विषय मांडून अतिक्रमण कारवाई करण्याची मागणी केली होती. याची तातडीने दखल घेवून पाटबंधारे विभाग व हडपसर महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्यावतीने ही कारवाई तातडीने करण्यात आली. 

पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडूरंग शेलार, उपविभागीय अधिकारी आर. एस, क्षिरसागर, शाखा अधिकारी श्रृती फासले, हडपसर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक अंजूम बागवान, हडपसर सहाय्यक आयुक्त संघ्या घोगरे यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

Web Title: pune news hadapsar slum anti enchroachment action