डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

हडपसर - मांजरी येथे एकाने स्वतःच्या पिस्तुलातून डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. त्याची प्रकृती चिंताजनक असून, खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

राहुल काळूराम म्हस्के (वय ४५, रा. रेल्वे फाटकाजवळ, मांजरी) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. हडपसर पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक अंजूम बागवान यांनी याबाबत माहिती दिली. राहुल हे घरात एकटेच होते. त्या वेळी त्यांनी स्वत:च्या लायसनधारी पिस्तुलातून डोक्‍यात एक गोळी झाली. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे लोक त्यांच्या घराकडे धावले. तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते मद्यपान करत होते. त्यातून वैफल्य आल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या घटनेमागील कारण स्पष्ट होऊ शकेल.

Web Title: pune news hadapsar suicide