हमारी मेहमान नवाजी का तजुर्बा लीजिए

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

पुणे - ‘‘ती मूठभर माणसे आहेत... वातावरण प्रदूषित करताहेत. भारत आणि काश्‍मीर यांच्यात दुरावा आणू पाहत आहेत. त्यांना आपण वेगळे व्हावे, आपल्यातील नाते संपावे, असेच वाटतेय. हे आपल्याला होऊ द्यायचे नाही. उलट आपल्याला नाते अधिक घट्ट बनवायचे आहे. त्यासाठी तुम्ही काश्‍मिरी लोकांना भेटा. बोला. तुम्हाला वाटतेय तसे काश्‍मीर मुळीच नाही. हे अनुभवा...,’’ जम्मू- काश्‍मीर विधानपरिषदेचे सभापती हाजी अनायत अली काश्‍मीरबद्दल भरभरून बोलत होते. ‘काश्‍मीर की मेहमान-नवाजी का तजुर्बा लिजिए’ अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला काश्‍मीरला येण्याचे ‘निमंत्रण’ही दिले.

सरहद संस्थेच्या काश्‍मीर महोत्सवानिमित्ताने हाजी अनायत अली सध्या पुण्यात आले आहेत. त्यांनी ‘सकाळ’ला सदिच्छा भेट देऊन संपादकीय सहकाऱ्यांशी शनिवारी संवादही साधला. आत्मघातकी हल्लेखोर म्हणून पुण्याच्या एका मुलीला नुकतीच अटक झाली आहे. या घटनेमुळे पुण्याला मान खाली घालावी लागलीच ना ! तसेच, जम्मू-काश्‍मीरचेही आहे. तिथेही असे मूठभर लोक आहेत, जे वातावरण गढूळ बनवत आहेत, असे सांगत अली यांनी तिथल्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधून घेतले. ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार या वेळी उपस्थित होते. 

अली म्हणाले, ‘‘जम्मू- काश्‍मीरमध्ये बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. अशा तरुणांना हाताशी धरून काही लोक दगडफेक घडवून आणत आहेत, त्यामुळे तरुणांना चांगल्या कामात गुंतवले गेले पाहिजे. सरकारचा तसा प्रयत्नही सुरू आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मिळणे, त्या वाढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे तिथल्या तरुणांना काम तर मिळेलच, शिवाय भारतीयांचे येणे-जाणेही वाढेल. त्यामुळे जम्मू- काश्‍मीरचे सध्याचे वातावरण बदलायला मोठी मदत होईल.’’

जम्मू- काश्‍मीरमधील पूर्वीच्या सरकारने चांगली कामे केलेली आहेत; पण त्यांच्यापेक्षा अधिक चांगली कामे आत्ताचे सरकार करत आहे, असा अनुभव तिथल्या जनतेला आहे. रोजगार निर्माण, पक्के रस्ते, विमानतळांचा विस्तार, खेड्यांचा विकास... अशी वेगवेगळी कामे सरकारला महत्त्वाची वाटतात. त्यादृष्टीने ते पावलेही टाकत आहेत. सैन्यानेही अशा प्रश्‍नांप्रती तत्परता दाखवायला हवी. हे प्रश्‍न सुटले तर सामान्य जनतेचा फायदा आहे, तसा सैन्याचाही आहे, असे सांगून अली म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीर आणि आजूबाजूच्या भागातील विमान सेवा प्रचंड महाग आहे, त्यामुळे विमानाच्या तिकिटांचे दर कमी व्हावेत, विमानाच्या फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी आमची केंद्र सरकारकडे मागणी आहे.’’

Web Title: pune news haji anayat ali talking