हरिभाऊ सातपुते यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

पुणे - पीएमटीचे माजी महाव्यवस्थापक हरिभाऊ लक्ष्मण सातपुते (वय 76) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. 

पुणे - पीएमटीचे माजी महाव्यवस्थापक हरिभाऊ लक्ष्मण सातपुते (वय 76) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. 

राज्य सरकारच्या सेवेत सातपुते हे तहसीलदार म्हणून नियुक्त झाले. 1998 मध्ये रत्नागिरीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून ते निवृत्त झाले. दरम्यान 1989 ते 96 दरम्यान ते पीएमटीमध्ये महाव्यवस्थापक पदावर नियुक्त झाले. त्या काळात पीएमपीमध्ये सुमारे पाच हजार कामगारांना पहिल्यांदा बोनस मिळाला होता. तसेच पीएमटीमध्ये बसखरेदी करून त्याची परतफेडही त्यांनी यशस्वीपणे करून दाखविली होती. संस्थेला नफा मिळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना चांगले यश आले होते. पीएमटीमधील त्यांचा कारकीर्द यशस्वी ठरली होती. 

Web Title: pune news haribhau satpute