‘हॅलो, माय फ्रेंड’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

पुणे - सध्याचे धकाधकीचे आयुष्य जगताना तरुणाईला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी कौटुंबिक अडचण, कधी परीक्षेतील अपयशानंतर येणारे नैराश्‍य, तर कधी उच्च शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने होणारी द्विधावस्था. आता अशा समस्यांवर मार्ग काढण्यासाठी महापालिकेकडून ‘हॅलो, माय फ्रेंड’ हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात येत आहे. तरुण-तरुणींनी विचारलेल्या प्रश्‍नांना या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांमधील समुपदेशक योग्य सल्ला देतील. त्यामुळे युवा पिढीला दिलासा मिळणार आहे.
 
सहा लाखांची तरतूद

ऐन तारुण्यात किंवा आयुष्याचा ‘टर्निंग पाँइंट’ असलेल्या दहावी-बारावीच्या वर्षात चुकीचे पाऊल पडण्याची शक्‍यता असते. अशा प्रसंगातून तरुणाईला वाचविण्यासाठी महापालिकेने सन २०१५ मध्ये ‘हॅलो, माय फ्रेंड’ हा उपक्रम सुरू केला. तत्कालीन उपमहापौर आबा बागूल यांच्या संकल्पनेतून ही योजना तयार करण्यात आली. समाज विकास विभागाच्या वतीने युवक कल्याण योजनेअंतर्गत हा उपक्रम सुरूही झाला. परंतु या योजनेला दुसऱ्याच वर्षी ब्रेक लागला. आता स्थायी समितीने गुरुवारच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. योगेश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमासाठी सहा लाख रुपये खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. मुख्य सभेच्या मान्यतेनंतर हा उपक्रम राबविण्यात येईल.

समुपदेशकांच्या मदतीने हेल्पलाइन 
या योजनेचे केंद्र मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात राहील. कॉल सेंटर, फोन, टीव्ही, रेडिओ आणि इंटरनेटच्या माध्यमातून समुपदेशकांच्या मदतीने ही हेल्पलाइन कार्यान्वित राहणार आहे. कलाकार, सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळी अडचणीत आणि नैराश्‍यात सापडलेल्या तरुणाईला मार्गदर्शन करणार आहेत. 

समुपदेशन केंद्र - कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
समुपदेशकांकडून मिळणार सल्ला आणि मार्गदर्शन
भरकटलेल्या तरुणाईशी सुसंवाद 
जीवनाला चांगली दिशा मिळण्यास मदत

अडचणी आणि नैराश्‍यातून काही तरुण-तरुणी चुकीचा निर्णय घेतात. अशा तरुणांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळणे, ही काळाची गरज आहे. त्यामुळे हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. तो पुन्हा सुरू झाल्यास त्याचा तरुणाईला निश्‍चितच लाभ होईल. 
- आबा बागूल, माजी उपमहापौर

या योजनेला मुख्य सभेत मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यानंतर टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल.
- संजय रांजणे, मुख्य समाज विकास अधिकारी

Web Title: pune news hello my friend youth municipal