मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत

रमेश मोरे
बुधवार, 14 मार्च 2018

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गरजू मुलींना सावित्रीबाई फुले  दत्तक पालक  योजने अंतर्गत फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे, तौफिक सय्यद, सुजान पालक, गुणी बालक उपक्रमाचे चंद्रशेखर भोईटे, मुख्याध्यापिका सुनीता माळवदे ईत्यादींच्या हस्ते अार्थिक मदत करण्यात आली

जुनी सांगवी - नवी सांगवी येथील कै. यशवंतराव धोंडिबा टण्णू प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू वीस मुलींना नवी सांगवी येथील ओम साई फाउँडेशन व सांगवी महेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अर्थिक मदत करण्यात आली.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गरजू मुलींना सावित्रीबाई फुले  दत्तक पालक  योजने अंतर्गत फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे, तौफिक सय्यद, सुजान पालक, गुणी बालक उपक्रमाचे चंद्रशेखर भोईटे, मुख्याध्यापिका सुनीता माळवदे ईत्यादींच्या हस्ते अार्थिक मदत करण्यात आली. मराठे म्हणाले, सावित्रीबाईमुळे मुलींची शिक्षणासाठी सोय झाली.  मुलींनी या अार्थिक मदतीतून प्रेरणा घेवून विविध क्षेत्रात भरारी घेवून यश संपादन करावे.  कार्यक्रमांचे सांस्कृतिक विभाग प्रमुख उषा पोळ, संगीता फर्राटे, मंजिरी चांदेकर, माधवी गुरव, रेखा बोरसे, संगीता सोनवणे, रजनी पतंगे, देवीदास पडवळ आदिंनी संयोजन केले. सुनील दरेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
 

Web Title: pune news: help girls