बारावी फेरपरीक्षा ११ जुलैपासून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

पुणे - बारावीच्या मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ११ जुलैपासून सुरू होणार असून, २८ तारखेला संपेल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी पाच जूनपासून अर्ज भरण्यास सुरवात करायची आहे. विद्यार्थ्यांवर पडणारा नापासचा शिक्का पुसण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. 

बारावीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा ११ ते २४ जुलै या काळात होईल. या फेरपरीक्षांचे सविस्तर वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे. परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज भरला नाही, तर विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत १५ ते १९ जूनपर्यंत आहे.
परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. संकेतस्थळावरील वेळापत्रक अंतिम असून, त्यानुसार विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेची तयारी करावी, असे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.

Web Title: pune news hsc reexam start 11th july