आयआयटी-जेईई परीक्षेबाबत चर्चासत्र

आयआयटी-जेईई परीक्षेबाबत चर्चासत्र

पुणे - आयआयटी व भारतातील अन्य प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी लागणाऱ्या जेईई-ॲडव्हान्स व जेईई-मेन्स परीक्षा अनेक विद्यार्थ्यांना अवघड वाटतात. अवघड वाटणारा हा अभ्यास स्मार्ट व अचूक पद्धतीने कसा करावा या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘सकाळ विद्या’ व ‘देवधर्स ॲकॅडमी ऑफ एक्‍सलन्स’ने (डीएई) विशेष चर्चासत्र आयोजित केले आहे. 

स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा मंच येथे शनिवारी (ता. ४) सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल. या चर्चासत्रासाठी विद्यार्थी व पालकांना विनामूल्य प्रवेश आहे. मात्र http://www.vidyaseminars.com या संकेतस्थळावर नोंदणी आवश्‍यक आहे.

बऱ्याचदा गुणवत्ता असूनही केवळ योग्य मार्गदर्शनाचा अभाव, चुकीचे अभ्यासतंत्र व नियोजन यामुळे वर्षभर अभ्यास करूनही विद्यार्थी मागे पडतात. अभ्यासाला सुरवात करताना तयारी केव्हापासून आणि कशी करायची, असे प्रश्‍न विद्यार्थ्यांना भेडसावत असतात. विषयातील मूलभूत संकल्पना स्पष्ट असतील, तरच अवघड अभ्यास सोपा होतो. यासाठी आठवी, नववीपासूनच जेईई सारख्या परीक्षांचा पाया भक्कम करण्यासाठी आणि अवघड वाटणाऱ्या परीक्षा सोप्या करण्यासाठी ‘देवधर क्‍लासेस’ने हाती घेतलेल्या ‘देवधर्स ॲकॅडमी ऑफ एक्‍सलन्स’ (डीएई) या उपक्रमातून दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अचूक अभ्यास करण्यासाठीच्या तंत्राविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. देवधर क्‍लासेसचे संस्थापक, संचालक प्रा. संदीप देवधर आणि डीएईचे ॲकॅडमिक हेड प्रा. केदार रिसबूड मार्गदर्शन करणार आहेत.

आयआयटी-जेईई परीक्षेबाबत चर्चासत्र
कधी - शनिवार, ता. ४ नोव्हेंबर
केव्हा - सायंकाळी ६ वाजता 
कुठे - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे

विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य
नोंदणी आवश्‍यक - http://www.vidyaseminars.com
अधिक माहितीसाठी संपर्क - ९९२२९१३५१०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com