५९५ कोटींचा मिळकतकर अडीच महिन्यांमध्ये जमा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

पुणे - सवलतीमध्ये मिळकतकर भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत असून, मिळकत करदात्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. मिळकतकर वेळत न भरल्यास १ जुलैपासून त्यांना दोन टक्के शास्तीकर आकारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, गेल्या अडीच महिन्यांत ५९५ कोटी ४९ लाख रुपयांचा मिळकतकर जमा झाला असून, पुढील वर्षी मार्चपर्यंत १८०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट मिळकत कर विभागासमोर आहे.

मिळकतकर २५ हजार रुपयांच्या आत आहे, त्यांना आकारण्यात आलेल्या सर्वसाधारण कराच्या १० टक्के सवलत तसेच ज्या मिळकतीची सर्वसाधारण कराची रक्कम २५ हजार रुपयांच्या पुढे आहे, त्यांना आकारण्यात आलेल्या सर्वसाधारण कराच्या पाच टक्के सवलत देण्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. हा कर ऑनलाइन पद्धतीने भरल्यास दोन टक्के सवलत देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

शहरातील साडेआठ लाख मिळकतींपैकी सहा लाख ३४ हजार ६६० नागरिकांच्या मोबाइलची नोंद महापालिकेकडे आहे. त्यामुळे बिल मिळाले नाही तरी, महापालिकेकडे नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे रहिवाशांना त्यांच्या बिलाची रक्कम पाहून त्याचा भरणा करता येईल, अशी माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख सुहास मापारी यांनी दिली. www.propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर मोबाइल क्रमांकाच्या आधारे रहिवाशांना मिळकतकराची बिले पाहता येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

Web Title: pune news income tax pmc