...अन्‌ ‘ते’ उभे राहिले स्वतःच्या पायावर!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

हडपसर - महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी आरोग्य केंद्रात ४७ दिव्यांगांना जयपूर फूट मोफत बसविण्यात आले. यामुळे आम्हाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यामध्ये ६ ते ८५ वयोगटातील दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे. कृत्रिम पाय बसविल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहिल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. 

महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल गुजर म्हणाले, ‘‘ज्या दिव्यांगांनी यापूर्वी पायाची मापे दिली आहेत, त्या उर्वरित ३६ दिव्यांगांना १५ ऑगस्ट रोजी जयपूर फूट बसविण्यात येणार आहेत. एप्रिल महिन्यात दिव्यांगांसाठी ‘एलएन ४’ हा अत्याधुनिक कृत्रिम हात बसविण्याचे शिबिर घेतले होते. पाय नसल्यामुळे दिव्यांगांच्या सर्वच दैनंदिन हालचालींवर मर्यादा निर्माण होतात. त्यांना सामान्य माणसारखे जगणे शक्‍य होत नाही. त्यासाठी मंडळाने रोटरी क्‍लबच्या मदतीने पाय नसलेल्या दिव्यांगांसाठी जयपूर फूट बसवून, दिव्यांगाच्या सेवेचे अजून एक पाऊल उचलले आहे. 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष ‘सीजी लाइफ स्टाइल’चे अध्यक्ष दादा गुजर यांनी महाराष्ट्र आरोग्य मंडळ व रोटरी क्‍लब करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल गौरवोद्‌गार काढले. कार्यक्रमामध्ये जयपूर फूट बनविणाऱ्या कामगारांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र आरोग्य मंडळ, रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनचे रोटरी लोककल्याण मंडळ, रोटरी क्‍लब ऑफ पूना डाउन टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने जयपूर फूट बसविण्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Web Title: pune news jaipur foot free fitting to handicaped