

पुण्यातील जुन्नरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे घरातून बाहेर खेळायला गेलेल्या दोन सख्ख्या लहान भावंडांचा मृत्यू झाला आहे. ही मुले शनिवार दुपारपासून बेपत्ता होती. रात्री उशिरा त्यांचे मृतदेह आढळून आले. आफान अफसर इनामदार (वय १०) आणि रिफत अफसर इनामदार (वय सात) रा. इस्लामपुरा ( जुन्नर) अशी त्यांची नावे आहेत.