मुलींना शिकवा... मुलींना घडवा...

युनूस तांबोळी
गुरुवार, 4 जानेवारी 2018

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): मुलींना शिकवा... मुलींना घडवा, मुलगा मुलगी एकसमान दोघांनाही शिकवा छान च्या जयघोषणाने मुलींचे शिक्षण महत्वाचे असा संदेश देत कवठे येमाई (ता. शिरूर) येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेने गावातून जनजागृती फेरी काढली होती. ग्रामस्थांनी या जागृती फेरीचे स्वागत केले.

सावीत्रीबाई फुले जयंती निमित्त कवठे येमाई (ता. शिरूर) येथील जिल्हा परीषद शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातून जनजागृती फेरी काढण्यात आली होती. सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक शोभा बहिरट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालसभा घेण्यात आली. त्यावेळी शशीकला जगताप, संजय तळोले, बाळासाहेब इचके, शरद भोर, विमल जगताप, सुप्रिया भोर, सरीता दंडवते, आशा शिंदे, शिल्पा गावडे आदी ग्रामस्थ उपस्थीत होते. सावीत्रीबाई फुले यांची वेशभुषा करत विद्यार्थी व शिक्षकांची मनोगते झाली. शर्वरी भोर या विद्यार्थीनीने मी सावीत्रीबाई बोलतेय ही एकपात्री नाटिका सादर केली. बालीका दिन प्रतिज्ञा देण्यात आली.

शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत सावीत्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Web Title: pune news kawthe yemai savitribai phule jayanti