Pune : खडकवासला धरणाच्या पाण्यात फेकण्यात आला मोठा औषधांचा साठा; हवेली पोलीस आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल

धरणासह लाखो पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
pune
punesakal

सिंहगड: लाखो पुणेकरांची तहान भागविणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे अधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्यासह इतर कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा थेट पाण्यात फेकण्यात आल्याने खडकवासला धरणासह पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

खडकवासला धरणावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चौपाटीजवळ धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात औषधांचे बॉक्स फेकलेले असल्याचे दिसून आले.

काही बॉक्स पाण्याजवळ तर काही औषधांच्या बाटल्या थेट पाण्यात फेकण्यात आलेल्या होत्या. यामध्ये इंजेक्शन, लहानमोठ्या भरलेल्या औषधांच्या बाटल्या व इतर साहित्य दिसून येत आहे. सुरक्षा रक्षकांनी तातडीने ही माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत हवेली पोलीसांना कळविल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात पडलेल्या औषधांच्या बाटल्या बाहेर काढून घेतल्या असून घटनास्थळी काचांचा खच दिसून येत आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे व हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी फोनला उत्तर दिले नाही.

pune
Pune Crime : हॉटेलमध्ये जास्त वेळ बसल्याने पुण्यात ग्राहकाला दांडक्याने मारहाण, डोक्यात फोडली बाटली; तिघांना अटक

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

खडकवासला धरणाच्या सुरक्षिततेबाबत सकाळ' ने सातत्याने प्रशासनाचे लक्ष वेधलेले असून सकाळ'च्या पाठपुराव्यामुळे पर्यटकांना पाण्यात उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच दिवसभर धरण परिसरात तेरा सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

मात्र रात्रीच्या वेळी चौपाटी परिसरात सुरक्षारक्षक नसल्याने थेट धरणाच्या पाण्यात औषधे फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळीही सुरक्षारक्षक तैनात असण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

pune
Pune News : महापालिकेतील लिफ्टमध्ये दोन तास अडकला कर्मचारी

बातमी करायची नाही?

'तुम्ही हे फोटो, व्हिडिओ काढले ते कोठेही शेअर करायचे नाहीत, तुम्हाला नीट सांगतोय', असे म्हणत उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने प्रकरण दडपण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

धक्कादायक म्हणजे चार ते पाच मोठे बॉक्स औषधांच्या बाटल्या भरलेल्या स्पष्ट दिसत असताना संबंधित अधिकारी दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बाटल्या रिकाम्या असल्याचे सांगत होता.

त्यामुळे पोलीस या धक्कादायक प्रकरणाचा गांभीर्याने तपास करुन संबंधित समाजकंटकाचा शोध घेणार की केवळ कागदी घोडे नाचविले जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com