खडकवासलामधून 1706 क्‍युसेकने विसर्ग 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

खडकवासला - धरण साखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरण शुक्रवारी रात्री नऊ वाजता 97 टक्के भरले. त्यानंतर धरणातून 1706 क्‍युसेकने पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. यासाठी धरणाचे चार व सहा क्रमांकाचे दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले. त्याचबरोबर, कालव्यातून अकराशे क्‍युसेक असे एकूण सुमारे 2800 क्‍युसेकने पाणी सोडून धरणाची पातळी कायम ठेवली जात आहे. 

खडकवासल्याचा पाणीसाठा आज सकाळी सहा वाजता 81 टक्के झाला होता. त्या वेळी धरणात सुमारे साडेसहा हजार क्‍युसेकची आवक होत होती. जास्तीचे पाणी सोडण्यासाठी कालव्याचा विसर्ग 900 वरून 1100 केला. दुपारी एक वाजता पाणीसाठा 90 टक्के झाला. त्यामुळे, कालव्यातून जास्त पाणी सोडून पाणी पातळी कायम ठेवण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभागाने केला; परंतु पावसाचा जोर कमी होत गेला आणि आवकही कमी झाली. 

खडकवासला धरणात 17 जुलै रोजी 44 टक्के साठा होता. उरलेले जवळपास निम्मे धरण नंतरच्या पाच दिवसांत भरले. गुरुवार आणि शुक्रवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणसाठ्यात मागील काही दिवसांपेक्षा दुपटीने वाढ झाली. शनिवारी सकाळी प्रत्येक तासाला सुमारे साडेसहा हजार क्‍युसेकने पाणी खडकवासला धरणात जमा होत होते. यामुळे शनिवारी सकाळी 81 टक्के पाणीसाठा होता; परंतु दुपारी एकनंतर पावसाचा जोर कमी झाला. रात्री नऊ वाजता पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. 

टेमघरला 24 तासांत 138, तर शुक्रवारी दिवसभरात 82 मिमी पाऊस झाला. शुक्रवारी संध्याकाळी 35.53 टक्के पाणीसाठा झाला. पानशेतमध्ये 24 तासांत 91, तर आज दिवसभरात 58 मिमी पाऊस झाला. संध्याकाळी पाणीसाठा 77.40 टक्के झाला. वरसगावला 24 तासांत 86, तर आज दिवसभरात 56 मिमी पाऊस झाला. संध्याकाळी पाणीसाठा 35.53 टक्के झाला. 

...तर खडकवासला भरले असते 
गुरुवारी पाऊस वाढला. तसेच खडकवासला धरणातील पाणीसाठा 70 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झाला होता. म्हणून गुरुवारी दुपारी 500, संध्याकाळी 700, नंतर शुक्रवारी सकाळी 900, अकरा वाजता 1100 क्‍युसेकने पाणी सोडून धरणातील पाण्याची पातळी कायम ठेवण्यात आली; अन्यथा शुक्रवारी सकाळीच खडकवासला 100 टक्के भरले असते.

Web Title: pune news khadakwasla dam