प्लॅस्टिकऐवजी खादीचा राष्ट्रध्वज वापरावा - विशाल चोरडिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

पुणे - प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रध्वजाचा सन्मान ठेवण्यासाठी प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वज न वापरता खादीचा तिरंगा वापरावा आणि देश तसेच खादी ग्रामीण कारागिरांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, हाच देशाच्या राष्ट्रध्वजाचा खरा सन्मान ठरेल हे ब्रीद वाक्‍य घेऊन राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया यांनी विशेष खादी मोहीम सुरू 
केली आहे.

राज्यातील मराठवाडा खादी समिती नांदेड ही संस्था ३० वर्षांपासून राष्ट्रध्वज तयार करण्याचे काम करत आहे. यामध्ये सूतकताई करून खादीच्या कपड्यापासून शासकीय नियमानुसार राष्ट्रध्वज तयार करण्याचे काम येथे केले जाते. चोरडिया यांनी या संस्थेला भेट देऊन संपूर्ण प्रक्रियेची पाहणी केली. तसेच देशात राष्ट्रध्वज पोचविण्याबाबत खादी कारागिरांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्‍वासन त्यांनी खादी संस्थेचे सचिव तथा माजी आमदार भोसीकर यांना दिले. चोरडिया यांनी मंडळाचे सभापती झाल्यानंतर वर्षभरात मंडळात नावीन्यपूर्ण बदल केले आहेत. महाखादी हा ब्रॅंड विकसित करण्यापासून महाखादी यात्रा, महाखादी शॉपी हा प्रवास ग्रामीण कारागिरांना सन्मान देणारा ठरला आहे.

काही दिवसांपासून फेसबुक, व्हॉट्‌सॲप आणि ट्विटरवर ‘खादी का तिरंगा’ मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पसरवला गेला असून, खादी हे फक्त वस्त्र नसून तो विचार आहे. यासाठी खादीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी चोरडिया यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत चोरडिया म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी वर्धा येथे खादी धोरण ठरविण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार मंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. महिन्यात खादी धोरण मसुदा जाहीर करणार आहोत. राज्यातील खादी संस्थांना नवसंजीवनी देण्यासाठी खादी धोरण निश्‍चितच फायदेशीर ठरणार आहे.’’

Web Title: pune news khadi national flag