बच्चे कंपनी, पालकांसाठी नृत्य स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

‘सकाळ’, पुणे सेंट्रल मॉलतर्फे ‘किड्‌स अँड मॉम फेस्ट’चा रविवारी जल्लोष

पुणे - उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद जल्लोषात साजरा करण्यासाठी मुले व पालकांसाठी ‘सकाळ’ने ‘किड्‌स अँड मॉम फेस्ट’ आयोजित केला आहे. हा फेस्टिव्हल येत्या रविवारी (ता. २८) कोरेगाव पार्क येथील पुणे सेंट्रल मॉल येथे होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये बच्चेकंपनीसह पालकांनाही विविध उपक्रमांची भन्नाट मेजवानी मिळणार असून, फेस्टची नोंदणी सुरू झाली आहे. 

मुले व पालकांनी एकत्रितरीत्या वेगवेगळ्या उपक्रमांत सहभागी व्हावे, या उद्देशाने या भन्नाट ‘फेस्ट’मध्ये आई आणि मुलांसाठी खास डान्स वर्कशॉप घेण्यात येणार आहे. ज्यांची मुले तीन महिने ते सात वर्षे या वयोगटात आहेत, अशा महिलांना या वर्कशॉपमध्ये सहभागी होता येईल. 

नृत्य स्पर्धेत सायकल व ‘पीएसपी’सारखी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मुलांना मिळणार आहे. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी आपल्या गाण्याची ‘एमपी थ्री सीडी’ सोबत आणावयाची असून, प्रत्येक स्पर्धकाला जास्तीत जास्त दोन मिनिटे नृत्यासाठी दिली जातील. सोलो डान्स स्पर्धेसाठी आयटम सॉंगची निवड करता येणार नाही. या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या दिवशी सायंकाळी होणार आहे.

Web Title: pune news kids & mom fest event