
रुपेश बुट्टेपाटील
आंबेठाण : मागील तीन दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक ठिकाणी घराचे, इमारतीचे स्लॅब तसेच भिंत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. नुकतेच कोरेगाव खुर्द आणि कोरेगाव बुद्रुक ( ता.खेड ) या दोन गावांदरम्यान असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची कोरेगाव खुर्द बाजूकडील पूर्वेकडील भिंत कोसळली आहे.