पुणे : कोथरूडमध्ये अल्पवयीन मूकबधीर मुलीवर बलात्कार

शुक्रवार, 30 जून 2017

फिर्यादी वडील हे अंध असून, पीडित मुलगी मूकबधीर आहे. त्यांच्या घराशेजारी गॅरेज असून, तेथे शाहरूख नावाचा मेकॅनिक आहे. त्याने या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला.

पुणे - एका तरुणाने 16 वर्षीय मूकबधीर मुलीवर बलात्कार केल्याची घटना कोथरूड येथील केळेवाडी परिसरात घडली. पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून कोथरूड पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. 29) रात्री बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहारूल इस्लाम अब्दुल वाहिद लस्कर ऊर्फ शाहरूख (वय 26, रा. आदर्श चौक, केळेवाडी, कोथरूड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तो मूळचा आसामच्या सिलचर जिल्ह्यातील रूकनी पाटवाना येथील आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वडील हे अंध असून, पीडित मुलगी मूकबधीर आहे. त्यांच्या घराशेजारी गॅरेज असून, तेथे शाहरूख नावाचा मेकॅनिक आहे. त्याने या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी गुरुवारी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल करून त्या तरुणाला अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला सहायक पोलिस निरीक्षक पंचभाई करीत आहेत.

Web Title: pune news kotharud news rape news crime news