नगर कल्याण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यु

leopard
leopard

उदापूर (ता.जुन्नर) - नगर कल्याण महामार्गावर पिंपरीपेंढार ता.जुन्नर गावच्या हद्दीत अज्ञात वहानाच्या धडकेने काल (गुरुवार) रात्री साडेनऊ दरम्यान बिबट्याचा मृत्यु झाला. याबाबत स्थानीक नागरीकांनी वनविभागाला माहीती दिल्यावर वनविभागाचे कर्मचारी तेथे हजर झाले.

याबाबत ओतूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल सचिन रघतवान म्हणाले कि नगर कल्याण महामार्गावर पिंपरीपेंढार गावच्या हद्दीत रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या जागीच ठार झाला. सदर बिबट्या मादी असुन अंदाजे सहा वर्ष वयाची होती. मयत झालेल्या मादी बिबट्याचे माणिकडोह येथिल बिबट निवारण केंद्राचे डॉ.अजय देशमुख यांनी सकाळी शवविच्छेदन केले. त्या नंतर सदर मयत बिबट्याचे  उदापूर येथिल वनविभाच्या रोप वाटीकेमध्ये दहन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com