Pune News : कामावर चाललेल्या तरुणाच्या दुचाकीला बिबट्याची धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune News leopard hit bike of youth injured chakan

Pune News : कामावर चाललेल्या तरुणाच्या दुचाकीला बिबट्याची धडक

निरगुडसर : रस्त्यावरून प्रवास करताना यापूर्वी कुत्रे आडवे जाऊन अपघात होत होते आता चक्क बिबटे आडवे जाणे,धडकण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून प्रवास धोकादायक बनू लागला आहे अशाच प्रकारे आंबेगाव तालुक्यातील जवळे येथुन दुचाकीवरून चाकण येथे कंपनीत कामावर जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला बिबट्याने अचानक येऊन धडक दिल्याची घटना गुरुवार ता. १६ रोजी पहाटे घडली असून चालक अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

जवळे ता. आंबेगाव येथील अभिजित महादेव शिंदे वय २५ हा तरूण चाकण येथे महिंद्रा कंपनीत कामाला असून त्याला फस्ट शिप असल्याने तो गुरुवार ता. १६ रोजी पहाटे दुचाकीवरून कामाला जातअसताना पहाटे ४:३० च्या सुमारास वळसेमळा हद्दीत एक बिबट्या रस्ता ओलांडत असताना त्याच्या दुचाकीच्या पुढच्या बाजूला धडकला बिबट्या जोरात धडकल्याने शिंदे हा दुचाकीसह रस्त्यावर पडला यात त्याच्या हाताला,

डोक्याला, पायाला मार लागला आहे,ही घटना पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात बिबट्याची दुचाकीला पुढच्या चाकाला धडक बसल्याने तरूण दुचाकीसह रस्त्यावर पडल्याने जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.