गवळीवाडा राम मंदिराचा जिर्णोद्धार, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

लोणावळा: गवळीवाडा येथील पुरातन व जागृत श्रीराम मंदिराच्या जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गुढीपाडव्यापासून (ता. 18) सुरुवात होत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होणारा हा सोहळा चैत्र शुद्ध एकादशीपर्यंत (27 मार्च) चालणार असून, या दहा दिवसांत भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोणावळा: गवळीवाडा येथील पुरातन व जागृत श्रीराम मंदिराच्या जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गुढीपाडव्यापासून (ता. 18) सुरुवात होत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होणारा हा सोहळा चैत्र शुद्ध एकादशीपर्यंत (27 मार्च) चालणार असून, या दहा दिवसांत भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत मंगळवारी (ता. 20) भांगरवाडी ते गवळीवाडा दरम्यान मंदिराची घंटा, कळस, श्रीमद भागवत ग्रंथ व महाध्वज यांच्या शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गवळीवाडा येथील हे श्रीराम मंदिर शंभर वर्षाहून अधिक जुने असून त्याच्या उभारणीसाठी दगड, वीटा, माती, सागवानी लाकूड व चुन्याचा वापर केला गेला होता. गेल्या शंभर वर्षात मंदिराची नावलौकीकात सातत्याने भर पडत असल्याने त्याची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे येथील व्यवस्थांचे नुतनीकरण गरजेचे झाले होते. परिणामी, येथील रहिवाशांनी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम मंदिर जिर्णोद्धार कमिटीने गेले दोन वर्षे परिश्रम घेऊन हे काम पुर्णत्वास नेले आहे. त्यासाठी गवळीवाडा परिसरातील रहिवाशांसह अनेकांनी वस्तुरुपाने व रोख देणगीद्वारे या जिर्णोद्धारास हातभार लावला आहे, अशी माहिती मंदिर जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष दत्तात्रय गवळी यांनी दिली.

मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा व अन्य सर्व धार्मिक कार्यक्रम पं. अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. या सोहळ्या अंतर्गत 18 ते 25 मार्च दरम्यान सायंकाळी 6 ते रात्री 9.30 या वेळेत श्रीमद भादवत कथा सत्पाहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. 21) सकाळी 8 ते 12 व दुपारी 2 ते 6 या वेळेत श्री गणेश पूजनाचा कार्यक्रम होणार आहे तर 22 मार्चला (गुरुवार) प्रधान राम परिवार देवता महापूजन व महाअभिषेक होणार आहे. 23 मार्चला (शुक्रवार) प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

25 मार्चला दुपारी 12.30 वाजता श्रीराम जन्मसोहळा होणार असून, परंपरेनुसार सायंकाळी श्रीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. 26 मार्चला कुस्त्याचा आखाडा भरविण्यात येणार आहे तर 27 मार्च रोजी महिलांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असेही गवळी यांनी स्पष्ट केले.

Web Title: pune news lonavala gawaliwada ram mandir