लोणावळा शहर पत्रकार संघ व आर्टिस्टचा नगरपरिषदेकडून गौरव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

लोणावळा: स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत नागरिकांचा सहभाग या विभागात देशभरातून निवडण्यात आलेल्या २४ सर्वोत्कृष्ट उपक्रमांमध्ये लोणावळा शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धांचा आणि लोणावळा आर्टिस्ट ग्रुपच्या भिंत्तीचित्रांद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्याच्या अभिनव उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. या गौरवास्पद कामगिरीबद्दल या दोन्ही संघटनांचा लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

देशभर सध्या 'स्वच्छ सर्वेक्षण २०१८' चे गुणांकन सुरू आहे. त्यामध्ये स्वच्छता अभियानातील स्थानिक नारगरिकांचा तसेच संस्था- संघटनांचा सहभाग याचाही विचार केला जातो. त्याअंतर्गतच असे उपक्रम राबविणाऱ्या संस्थांची माहिती संकलित केली गेली. देशभरातून निवडल्या गेलेल्या २४ पैकी 3 उपक्रम महाराष्ट्रातील असून त्यापैकी 2 उपक्रम लोणावळ्यातील आहेत.

लोणावळा नगरपरिषदेसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या दोन्ही संस्थांचा नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: pune news lonavala nagar parishad journalist and artist