जगण्याचा वेग थोडा कमी करण्याची गरज: डॉ. उपाध्ये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

पुणे: धकाधकीच्या जीवनात आनंदाचे क्षण वेचण्यासाठी, जगण्याचा वेग थोडा कमी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांनी नुकतेच येथे केले. खानापूर येथे टिकेकर नगरीत आयोजित ''आम्हीच पहिले 10+2+3'' या लोणावळ्याच्या व्हीपीएस हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात 'सेकंड इनिंगकडे पाहताना' या विषयावर ते बोलत होते.

डॉ. उपाध्ये पुढे म्हणाले की, प्रवास करताना आपली गाडी वेगाने जात असेल तर, रस्त्याकडेच्या निसर्गसौंदर्यांचा पुरेपूर आस्वाद आपल्याला घेता येत नाही. त्याचप्रमाणे जीवनाचा वेग अधिक असेल, तर आजुबाजुला घडणाऱ्या छोट्या- छोट्या गोष्टींमधील आनंद आपल्याला अनुभवता येत नाही. म्हणून उगवत्या दिवसाबरोबर नवीन आनंदाचा दिवस सुरू करण्याची किमया ज्याला साधते, त्याची 'सेकंड इनिंग'ही उत्तम जाऊ शकते.
पंढरपूरच्या वारीतील थकल्या भागल्या वारकऱ्यांची चरणसेवा करण्याच्या कार्याबद्दल चंद्रकांत माजगणकर यांना तर 'यात्री स्वरतरंगाचे' या संस्थेमार्फत लोणावळ्यातील होतकरू कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या संजय गोळपकर यांना यावेळी उपाध्ये यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

स्नेहमेळाव्याकरिता लोणावळा, पुणे, नगर, नेरळ, मुंबई, बेळगाव येथून मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी आले होते. या वेळी आयोजित विविध स्पर्धांमध्ये आपले वय विसरून सर्वांनी भाग घेतला. अजय टिकेकर यांनी स्वागत केले. विवेक साने यांनी प्रास्ताविक केले. संजय जोशी यांनी आभार मानले, तर सुनील कडूसकर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: pune news lonavala vps high school student dr sanjay upadhye