esakal | पुणे : महात्मा फुले मंडईत आग
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : महात्मा फुले मंडईत आग

पुणे : महात्मा फुले मंडईत आग

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : महात्मा फुले मंडईत आग लागल्याची घटना काल (ता.10) मध्यरात्री घडली. ब्रिटिश कालीन मंडईच्या मागील बाजूस छताला आग लागल्याची माहिती मिळत असून अद्याप कारण समजले नाही. (pune news mahatma phule mandai fire)

अग्निशमन दलाच्या तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही मात्र, मंडईतील काही भाग जळाल्याने नुकासान झाले आहे.

हेही वाचा: पुरंदर विमानतळासाठी बारामतीतील ३, पुरंदरची ५ गावे

अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटिश कालीन वास्तू असलेली महात्मा फुले मंडईमध्ये बहुतांश लाकडी भाग आहे. अग्निशामन दलास रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मंडईत आतमध्ये छताला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत काही भाग जळून खाक झाला होता. अग्निशमनदलाच्या 2 गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली आहे.

हेही वाचा: ‘घरात येऊ, कोरोना लस देऊ’; पुण्यात उपक्रम सुरु