‘महावितरण’कडून सुटीतही कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

पुणे - वीजबिल मुदतीत न भरणाऱ्या थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम साप्ताहिक सुटीच्या दिवशी (ता. २४ आणि २५) या दोनही दिवस केले जाणार आहे. तसेच महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र यादिवशी सुरू राहणार आहेत. 

थकीत वीजबिलाची रक्कम वाढल्याने महावितरणने राज्यात वीजबिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. मुदतीत वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस साप्ताहिक सुटी असली, तरी थकबाकीदारांविरुद्धची मोहीम यादिवशी सुरूच ठेवली जाईल. ग्राहकांना वीजबिलाची रक्कम भरता यावी; म्हणून भरणा केंद्रही सुरू ठेवली जातील.

वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चालू व थकीत वीजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी  www.mahadiscom.in  या संकेतस्थळाचा आणि  मोबाईल ॲपचा ग्राहक उपयोग करू शकतील.

Web Title: pune news mahavitaran crime