बैलगाडा शर्यती बाबत लवकरच बैठक : मुख्यमंत्री

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 16 डिसेंबर 2017

मंचर (पुणे) : ''बैलगाडा शर्यती पूर्ववत सुरु होण्यासाठी बैलगाडा संघटनेचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत लवकरच बैठकीचे आयोजन केले जाईल.'' असे अशावासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

नागपूर येथे विधान सभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन बैलगाडा शर्यतीबाबत चर्चा केली. यावेळी त्यांना निवेदनही दिले.

'महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीचा व परंपरेचा एक भाग म्हणून राज्यातील गावांमध्ये कुलदैवताच्या यात्रा, जत्रा या दिवशी बैलगाडा शर्यती आयोजित
केल्या जात होत्या. बैलांच्या मूळ प्रजाती टिकवून ठेवण्यात बैलगाडा शर्यतीचा महत्वाचा वाटा आहे. शेतकरी पोटाच्या मुलांप्रमाणे बैलांना जीव लावतात. बैलगाडा
शर्यती पूर्ववत व्हाव्यात यासाठी विधान सभेने 6 एप्रिल 2017 रोजी संमत केले. यासंदर्भात नियमावली प्रसिद्ध करण्याच्या पातळीवर न्यायालयात प्रकरण गेल्यामुळे सध्या उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातलेली आहे. शासनाच्यावतीने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. बैलगाडा शर्यती सुरु करण्याची ग्रामीण भागातील जनतेची आग्रही मागणी आहे. शासनाच्यावतीने बैलगाडा शर्यत पूर्ववत सुरु करण्याबात सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे शासनाची बाजू मांडावी, अशी विनंतीही वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Web Title: pune news manchar soon to discuss ballgada race: devendra fadnavis